श्लोक 50
श्लोक 50
ओडिसी नृत्यात नृत्यांगनेच्या पांढर्या
शुभ्र पेहरावाला उठाव येण्यासाठी मागे काळा पडदा लावलेला असतो. ह्या काळ्या पार्श्वभूमीवर
नर्तिकेच्या सर्व हालचाली उठावदार दिसतात. येथेही जगन्नाथरायांनी स्वतःची प्रतिमा
जास्तीजास्त पतित, पापी अशी रेखाटण्यामुळे त्या पार्श्वभूमीवर गंगेची महती विशेष
अधोरेखित झाली आहे. एका बाजूला पापी लोकांचं काळं जग तर दुसर्या बाजूला पुण्यवंतांचं
उज्ज्वल धवल जग! जगन्नाथ हा जणु महापापी लोकांमधला विषकंद तर गंगा म्हणजे कितीही
भयंकर पापांचं उच्चाटन करणारी अमृताने सांद्र झालेली अनुपम स्वर्गीय शक्ती! एका
बाजूला कमतरतेची खोल खाई तर शेजारीच सद्गुणांचे गगनचुंबी हिमशिखर! ही दोघांमधील दाखवलेली तफावत एक सुंदर कृष्णधवल परस्पर
विरोधी श्लोकचित्र तयार करते.
जगन्नाथराय म्हणतात, हे जननी मी फार भयंकर
माणूस आहे. माझ्या पापांचा पाढा वाचला तर तो पुरा होणार नाही. माझी पापे क्षालन करण्याचा
विषय समोर येताच; मंत्रांमधील शक्तीच जणु गळून गेली. औषधांचा प्रभाव ओसरणीला
लागला. मला पहाताच सार्या रामबाण औषधांनीही ह्याला औषध नाही म्हणून जणु उघडेला जडिबुटींचा
बटवा बंद करून टाकला. माझा पापांच्या क्षेत्रातील ‘पराक्रम’ ऐकून देवांची
घाबरगुंडी उडाली. नवसंजीवन रसाने संपृक्त असलेल्या असलेल्या अमृताचे पार चिपाड
होऊन गेले. अत्यंत ताकदवान, वेगवान भरारीसाठी
जो गरूड पक्षी प्रसिद्ध आहे असा गरूड ज्यांची देवता आहे अशी मौल्यवान पाचू रत्ने मला
पहाताच भंगली.
हे माय मी पापांनी संपृक्त तर तू अमृताने
सांद्र आहेस. येथे हा संसारदुःखाचा वणवा भडकला आहे. त्याच्या ज्वाळांनी मला
चहूबाजूने वेढलं आहे. त्याच्या भयंकर ज्वाळा मला चट् चट् चाटत आहेत. त्याचे चटके बसून
माझं अंतःकरण होरपळत आहे. हा असह्य दाह तुझ्याशिवाय कोण शमवू शकेल? तुझ्या अमृतमय
लहरींमधे इतके सामर्थ्य आहे की, ह्या मुकुंदाच्या पायांना कालियावर नाचतांना
त्याचं जे विष लागलं होतं ते तुझ्या पीयूषलहरींनी धवून टाकलं. संसाराच्या
ज्वालांनी मला पुरत घेरलं आहे मी त्यात जळतो आहे. तुझ्यात उठणार्या ह्या
प्रसन्नतेच्या आनंदाच्या उत्तुंग लहरीच माझ्या अंतःकरणाचा दाह निववू शकतील.
(वृत्त
–शार्दूलविक्रीडित, अक्षरे – 19, गण- म सज स त त ग, यति – 12,7)
मन्त्रैर्मीलितमौषधैर्मुकुलितं त्रस्तं सुराणां गणैः
स्रस्तं सान्द्रसुधारसैर्विदलितं गारुत्मतैर्ग्रावभिः ।
वीचिक्षालितकालियाहितपदे स्वर्लोककल्लोलिनि
त्वं तापं तिरयाधुना मम भवज्वालावलीढात्मनः।। 50 ।।
हे मातः – हे माते! ; वीचि-क्षालित
– लाटांनी धुतलेले ; कालियाहितपदे - कालिया सर्पाचा शत्रु असलेल्या
कृष्णाचे पदं- चरण ; यया - जिने (विष्णुचे पाय धुणार्या) ; स्वर्लोककल्लोलिनी
– हर्ष प्रसन्नतेच्या मोठमोठ्या लाटा उसळणार्या हे स्वर्गलोकीची नदी गंगे ; यतः
– माझ्या तापशांतीविषयी ; मंत्रैः – वेदांनी, मंत्रांनी ; मीलितं –डोळे
मिटून घेतले. औषधैः – अनेक शास्त्रसिद्ध औषधांनी ; मुकुलितम् – कळ्यांप्रमाणे
मिटून गेली. हतवीर्य झाली, निरुपयोगी ठरली ; सुराणां गणैः – देवांच्या
समूहांनी ; त्रस्तं – आपल्या हातून उद्धार होत नाही म्हणून घाबरून गेले,
भयभीत झाले ; सांद्रसुधारसैः – तापशामक अमृतरसाने संपृक्त ; स्रस्तं –
गळून गेले ; गारुत्मतैः ग्रावभिः – ज्यांची देवता गरूड आहे असे रत्न पाचू ; विदलितं – फुटले ; ततः – म्हणून
; त्वं – तू ; भवज्वाला अवलीढा आत्मनः
- संसाराच्या ज्वाळांनी अंतःकरण घेरणार्या, चाटणार्या, वेढून घेणार्या
मम – माझ्या ; तापं – त्रिविध तापाला ; अधुना- आता ; तिरय
– निवारण कर घालव.
मंत्रांनी कर टेकिले मजपुढे, झाली उणी औषधे
संत्रासूनचि देव जाय पुरते, झाली सुधा म्लान गे ।
गे पाहोनि मलाच भंगति कसे पाचू भयाने पहा !
पोळे हा मजला भवाग्नि पुरता, चाटी भवाग्नी शिखा ।। 50.1।।
कालीयावर नाचता हरिपदा मालिन्य आले विषे
त्यासी तूच धुवोनि टाकि अमले भागीरथि प्राणदे ।
लाटा हया तव पुण्यश्लोक सरिते स्वर्गीय नादा करी
दे शांती भवतापदग्ध मज हया स्वर्लोककल्लोलिनी ।। 50.2 ।।
---------------------------------------------------
यच्च प्रेङ्खदखर्वगर्वघटितभ्रूभङ्गभीमाकृति- क्ष्माभृत्पाशमुखावलोकनघनप्रोल्लङ्घनाभीरुभिः ।
उन्मीलन्मृदुशाद्वले तरुतले स्वर्लोककल्लोलिनी- कूले मूलफलाशनैः शमसुधास्वादार्थिभिः स्थीयते ॥ २६ ॥
'स्तुतिकुसुमाञ्जलि'
(Stutikusumanjalih) चे कर्ते
महाकवी जगद्धर भट्ट
यांचा काळ १४ वे
शतक (सुमारे
१४ वे
ते १५
वे शतक) हा मानला
जातो
जगन्नाथ पंडित
(पंडितराज जगन्नाथ) यांचा
काळ १७ वे
शतक (साधारणतः इ.स.
१६२० ते १६६५)
हा मानला जातो。 ते
मुघल सम्राट जहांगीर आणि शाहजहान यांच्या दरबारातील
अत्यंत विद्वान संस्कृत
कवी आणि पंडित
होते
यह श्लोक महाकवि सर्वज्ञेश्वर (जगद्धर भट्ट) द्वारा रचित प्रसिद्ध स्तोत्र 'स्तुतिकुसुमाञ्जलि' (Stutikusumanjalih) के २६वें श्लोक का हिस्सा है जिसमें भगवान शिव की महिमा का वर्णन किया गया है।
यहाँ इस श्लोक का अन्विति (शब्दार्थ), भावार्थ और विस्तृत व्याख्या दी गई है:
शब्दार्थ और अन्वय:
- यच्च: और जो (स्थान)
- प्रेङ्खदखर्वगर्वघटितभ्रूभङ्गभीमाकृति: (प्रेङ्खत्
+ अखर्व + गर्व + घटित + भ्रूभङ्ग + भीम + आकृति) - हिलते हुए (प्रेङ्खत्), अत्यंत (अखर्व) अहंकार के कारण बनी हुई भौंहों के तनाव (भ्रूभङ्ग) से भयंकर आकार वाले
- क्ष्माभृत्पाशमुखावलोकन: (क्ष्माभृत्
+ पाश + मुख + अवलोकन) - राजाओं के बंधन और मृत्यु के मुख के दर्शन से
- घनप्रोल्लङ्घनाभीरुभिः: (घन
+ प्र + उल्लङ्घन + अभीरुभिः) - भली-भांति पार कर जाने में जो निर्भीक (अभीरु) हैं, उन महान भक्तों द्वारा...
- उन्मीलन्मृदुशाद्वले: खिले
हुए (उन्मीलत्) कोमल (मृदु) घास के मैदानों (शाद्वले) में
- तरुतले: वृक्षों की छाया में
- स्वर्लोककल्लोलिनीकूले: (स्वर्लोक
+ कल्लोलिनी + कूले) - स्वर्ग की नदी (गंगा) के तट पर
- मूलफलाशनैः: कंद-मूल और फलों का आहार करने वालों द्वारा
- शमसुधास्वादार्थिभिः: (शम
+ सुधा + आस्वाद + अर्थिभिः) - शांति रूपी अमृत (शमसुधा) का स्वाद चखने की इच्छा रखने वालों द्वारा
- स्थीयते: निवास किया जाता है।
भावार्थ:
यह श्लोक बताता है कि संसार के बड़े-बड़े राजाओं के घमंड, उनकी भयंकर भृकुटि (क्रोध) और मृत्यु के पाश (बंधन) से जो भक्त बिल्कुल नहीं डरते—वे निर्भीक भक्त शांत मन से कंद-मूल और फल खाकर, खिलती हुई हरी घास और पेड़ों की छाया में, गंगा के तट पर उस परम शांति रूपी अमृत का आनंद लेते हुए निवास करते हैं।
संक्षिप्त व्याख्या:
कवि यहाँ सांसारिक मोह-माया, राजाओं के आतंक और मृत्यु के भय से मुक्त होकर संन्यास या भक्तियोग अपनाने वाले संतों/भक्तों की महिमा का गुणगान कर रहे हैं।
१. सांसारिक भय से मुक्ति: जो लोग अहंकारी राजाओं के क्रोध और मृत्यु के भय को पार कर चुके हैं।
२. सात्विक जीवन: वे भक्त सांसारिक सुखों को छोड़कर गंगातट पर कंद-मूल खाकर प्राकृतिक वातावरण में रहते हैं।
३. परम शांति: उनका एकमात्र उद्देश्य सांसारिक भागदौड़ से दूर ईश्वर की भक्ति में लीन होकर 'शम' (मन की पूर्ण शांति) रूपी अमृत का पान करना होता है।
आप इस संपूर्ण स्तोत्र और उसकी विस्तृत टीका का पाठ Sanskrit Documents पर पढ़ सकते हैं।
---------------------------------------------------
Comments
Post a Comment