Posts

Showing posts from March, 2026

मनोगत

म नो ग त अनुप्रास, यमक, नादमाधुर्य असलेलं गंगालहरी सारखं अनुपम काव्य वाचताना वा पाठ म्हणतांना मन प्रसन्नतेने भरून जातं. त्याच्यातील अनेक ओळी; जशा 20 व्या श्लोकातील ‘मरुल्लीलालोल्ललहरिलुलिताम्भोजपटली ------- जलं ते जबालं मम जननजालं जरयतु’ त्याच्या नादमाधुर्याने मुखात घोळत राहतात तर, ‘ चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम्’ सारख्या ओळी त्यातील आर्त भावामुळे भाल्यासारख्या मनात रुतून बसतात. तर श्लोक 40, 51 मधील सवतीमत्सराच्याही अनोख्या कल्पना अचंबित करून टाकतात. ह्या सर्व स्तोत्राचे भावगर्भ आर्तपण, कल्पनाविलास, प्रवाहीपण तसेच ठेऊन; ते जर माझ्या माय मराठीत आणता आलं तर त्याची गोडी अनेकांना चाखायला मिळेल अशा हेतूने मी गंगा दशहरा च्या सुयोग्य मुहूर्तावर  मराठी समवृत्त भाषांतर  समाज माध्यमांवर ठेवले. ज्याप्रमाणे प्रवाही नदीचा उगम खडकाळ डोंगरातून होतो आणि हा प्रवास दूर सागराला मिळेपर्यंत चालू राहतो; तशी गद्यातील विश्लेषणाने झालेली सुरवात समवृत्त पद्याने जास्त प्रवाहीत होऊन लोकांची रुची वाढेल ह्या माझ्या कल्पनेला उचलून धरत हे सर्व लेखन (peeyushlahari.blogspot.com) ह्या ब्लॉगवर असू...